प्रभो शिवाजी राजा
- स्वातंत्र्यवीर सावरकर
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजाहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजाहे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजाहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकरि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदनाकरि अंतःकरणज तुज, अभि-नंदनातव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदनागूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्याहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाजी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवीजी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवीजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवीजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवीती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं देती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं देती शक्ति शोणितामाजीं, वाहुं देदे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्याहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.