- लाईफस्टाईल
» - वेबदुनिया विशेष 08
» - जाणता राजा
म्यानातून उसळे.....
म्यानातून उसळे तलवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सातते फिरता बाजूस डोळे, किंचित ओलेसरदार सहा सरसावुनि उठले शेलेरिकबीत टाकले पाय, झेलले भालेउसळले धुळीचे मेघ सात निमिषातआश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेनाअपमान बुजविण्या सात अर्पुनी मानाछावणीत शिरले थेट भेट गनिमांनाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातखालून आग, वर आग, आग बाजूंनीसमशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानीगदीर्त लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यातदगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचाओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचाअद्याप विराणी कुणी वार्यावर गात.