- लाईफस्टाईल
» - वेबदुनिया विशेष 08
» - जाणता राजा
शिवगान....
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वालादहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झालाशिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारादिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धाराहे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचेहे वादळ उग्र वीजांचेकाळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळलादहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झालाकडेकपारी घुमू लागले विजयाचे गानजळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राणरायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडेशिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडेशिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचेहे रुप शक्ति-युक्तिचेहा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आलादहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झालागंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्याशिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्याधीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतारअधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराजशिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय होह्या भरतभूमीचा जय होजयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या मालादहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.