शिवरायांचा पाळणा
राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||चालेल जागता चटकाहा असाच घटका घटकाकुरवाळा किंवा हटका का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||इकडे हे सिद्दीजवान तो तिकडे अफझुलखान पलिकडे मुलूख मैदानहे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||