Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघु रुद्राभिषेक पूजा Laghu Rudrabhishek

Published: गुरूवार, 7 मार्च 2024 (13:33 IST)
शिवलिंगावर पाण्याची पातळ धारा करून रुद्राभिषेक करावा. 
अभिषेक झाल्यावर ओम तन त्रिलोकीनाथाय स्वाहा मंत्राचा जप करा
. शिवलिंग कापडाने नीट पुसून स्वच्छ करा.
 
 
दुधाने अभिषेक
शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, दुधाने अभिषेक करा, भगवान शंकराच्या 'प्रकाश' स्वरूपाचे मानसिक ध्यान करा.
अभिषेकासाठी तांब्याचे भांडे सोडून इतर कोणत्याही धातूचे भांडे वापरावे. विशेषतः दूध, दही किंवा पंचामृत इत्यादी तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. यामुळे ते पदार्थ मदिरा समान होतात. तांब्याच्या भांड्यात पाण्याचा अभिषेक करता येतो, पण दुधाचा तांब्याशी संपर्क आल्याने ते विष बनते, त्यामुळे तांब्याच्या भांड्यात दुधाचा अभिषेक पूर्णपणे निषिद्ध आहे.
कारण तांब्याच्या पात्राने दूध अर्पित केल्याने नकळत देवाला विष अर्पित केलं जातं. पात्रात दूध भरुन पात्राला चारीबाजूने कुंकुं लावा-

लघु रुद्राभिषेक मंत्र 
ॐ श्री कामधेनवे नम: या मंत्राचा जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय’ चा जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर दुधाची पातळ धार सोडत रुद्राभिषेक करा.
दुधाने अभिषेक करत लघु रुद्राभिषेक मंत्र  ॐ सकल लोकैक गुरुर्वै नम: मंत्राचा जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा.
 
फळांचा रस
अखंड धन लाभ आणि कर्ज मुक्तीसाठी महादेवाला फळांच्या रसाने अभिषेक करा-
भगवान शिवच्या ‘नील कंठ’ स्वरूपाचे मानसिक ध्यान करा
पात्रात ऊसाचा रस भरुन पात्राला चारीबाजूने कुंकु लावा
ॐ कुबेराय नम: जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर फळांच्या रसाची पातळ धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करताना ॐ ह्रुं नीलकंठाय स्वाहा मंत्राचा जप करा
शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा
 
मोहरीच्या तेलाने अभिषेक
ग्रहबाधा नाश हेतु भगवान शिवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करा
भगवान शिवाच्या प्रलयंकर स्वरुपाचे मानसिक ध्यान करा
पात्रात मोहरीचे तेल भरुन पात्राला चारीबाजूने कुंकु लाव
ॐ भं भैरवाय नम: मंत्राचा जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय” जाप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर मोहरीच्या तेलाची पातळ धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करताना ॐ नाथ नाथाय नाथाय स्वाहा मंत्राचा जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा
 
चण्याची डाळ
कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीसाठी आणि कार्यात प्रगतीसाठी भगवान शंकराला हरभर्‍याच्या डाळीचा अभिषेक करा.
भगवान शिवाच्या समाधी स्थित स्वरुपाचे मानसिक ध्यान करा
तांब्याच्या पात्रात चण्याची डाळ भरुन पात्राला चारीबाजूने कुंकु लावा
ॐ यक्षनाथाय नम: मंत्राचा जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय चा जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर चण्याच्या डाळीची धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करत ॐ शं शम्भवाय नम: मंत्राच जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा
 
काळ्या तिळाने अभिषेक
तंत्र विघ्नांचा नाश आणि वाईट नजरेपासून संरक्षणासाठी काळ्या तिळाचा अभिषेक
भगवान शिवाच्या नीलवर्ण स्वरुपाचे मानसिक ध्यान करा
तांब्याच्या पात्रात काळे तीळ भरुन पात्राला चारीबाजूने कुंकु लावा
ॐ हुं कालेश्वराय नम: जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय चा जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर काळ्या तिळांची धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करत ॐ क्षौं ह्रौं हुं शिवाय नम: जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा
 
मध मिश्रित गंगा जल
संतान प्राप्ती आणि कौटुंबिक सुख-शांती साठी मध मिश्रित गंगा जलाने अभिषेक करा
भगवान शिवाच्या चंद्रमौलेश्वर स्वरुपाचे मानसिक ध्यान करा
पात्रात मध मिश्रित गंगा जल पात्राला चारीबाजूने कुंकु लावा
ॐ चन्द्रमसे नम: जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय’ जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर मध मिश्रित गंगा जलाची धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करत हुए ॐ वं चन्द्रमौलेश्वराय स्वाहा’ जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा
 
तूप आणि मध
रोगांचा नाश आणि दीर्घायुष्यासाठी तूप आणि मधाचा अभिषेक करा
भगवान शिवाच्या त्रयम्बक स्वरुपाचे मानसिक ध्यान करा
पात्रात मध आणि तूप भरुन पात्राला चारीबाजूने कुंकु लावा
ॐ धन्वन्तरयै नम: जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
शिवलिंगावर तूप आणि मधाची धार सोडत रुद्राभिषेक करा
अभिषेक करत ॐ ह्रौं जूं स: त्रयम्बकाय स्वाहा मंत्राचा जप करा
शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ वस्त्राने पुसा
 
कुंकुं आणि केशर हळद
आकर्षक व्यक्तिमत्व मिळविण्यासाठी भगवान शिवाला कुंकुम, कुंकू, हळद यांचा अभिषेक करा.
भगवान शिवाच्या नीलकंठ स्वरूपाचे मानसिक ध्यान करा
पात्रात कुंकू, केशर, हळद आणि पंचामृत भरुन पात्राला कुंकुं लावा. 
ॐ उमायै नम: जप करत पात्राला मौली बांधा
पंचाक्षरी मंत्र ॐ नम: शिवाय जप करत फुलांच्या पाकळ्या अर्पित करा
‘ॐ नम: शिवाय’मंत्र म्हणत लांच्या पाकळ्या अर्पित करा
कुंकुं आणि केशर हळदीने रुद्राभिषेक करा
अभिषेक मंत्र ॐ ह्रौं ह्रौं ह्रौं नीलकंठाय स्वाहा
शिवलिंगावर जलाने अभिषेक करा

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

मंगळवारी केवळ 5 मिनिट द्या, बजरंग बली सर्व कामे सुरळीत करतील

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments