गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Updated : सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (10:41 IST)

श्रीदेवीच्या पतीला कधीच माफ करणार नाही

ram gopal verma
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीबाबत दिग्दर्शक रामगोपाल वर्माच्या मनातल्या भावना उफाळून आल्या आहेत. वर्मा यांनी आत्मचरित्रातला एक अध्याय श्रीदेवीला समर्पित करताना तिचे पती बोनी कपूर यांना कधीच माफ करणार नाही, असं विधान केलं आहे.
 
रामगोपाल यांनी ‘गन्स अँड थाईस’ या पुस्तकात श्रीदेवीची तुलना सौंदर्याच्या देवतेशी केली आहे. तिच्याविषयीचं प्रेम व्यक्त करताना ‘हे आकर्षण होतं. मी खूप उत्साहात होतो. कोणालाही कोणाहीविषयी प्रेम वाटू शकतं. मग ती एखादी सामान्य व्यक्ती असो वा सेलिब्रेटी. तुम्ही त्या गोष्टीचा आनंद लुटता. ही एकप्रकारची नशा आहे’ असं रामगोपाल वर्मा म्हणतात.
 
‘श्रीदेवीला बोनी कपूरच्या स्वयंपाकघरात चहा बनवताना पाहून फार दु:ख होतं. एका परीला बोनी यांनी स्वर्गातून स्वयंपाकघरात आणलं. मी यासाठी त्यांना कधीच माफ करु शकणार नाही.’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. ऊर्मिलाच्या सौंदर्याला कॅमेरात कैद करण्यासाठी ‘रंगीला’ चित्रपटाची निर्मिती केली, असा खुलासाही रामगोपाल वर्मानी पुस्तकात केला आहे. या चित्रपटामुळे ऊर्मिला रातोरात सुपरस्टारपदी पोहोचली.