माकडांनीही केले शाही स्नान
उज्जैन- उज्जैन येथे सिंहस्थ महाकुंभमध्ये शाही स्नानासाठी साधू संत आणि भक्तांची खूप गर्दी झाली होती. हनुमान जयंतीला जुना अखाडाद्वारे स्नान सुरू झाल्यावर या शाही स्नानाचा आनंद घेयला माकडंही पोहचले.
महाकाळची भस्मारतीनंतर सुरू झालेल्या शाही स्नानासाठी इतर लोकांना वाट बघावी लागली असली तरी या माकडांनी पूर्ण आनंद घेतला. साधू संतांना बघण्यासाठी जमलेली गर्दीसाठी या माकडांचे आकर्षणही कमी नव्हते.
-भीका शर्मा