Biodata Maker marathi
✕

सदाबहार दाक्षिणात्य मेजवानी; मऊ लुसलुशीत इडली आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी

Updated: शनिवार, 11 एप्रिल 2026 (07:44 IST)
पाणी: गरजेनुसार
 
कृती-
भिजवणे: तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या. तांदळात मेथी दाणे टाका. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे ५-६ तास भिजत ठेवा. पोहे उपसण्यापूर्वी १५ मिनिटे भिजवा.
वाटणे: भिजवलेली डाळ आणि तांदूळ (पोह्यांसह) मिक्सरला वेगवेगळे वाटून घ्या. डाळ वाटताना थोडे पाणी घालून एकदम गुळगुळीत वाटा, तर तांदूळ थोडे रवाळ ठेवा.
आंबवणे: दोन्ही पिठे एकत्र करून चांगले फेटून घ्या. हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात झाकून उबदार जागी ८-१० तास किंवा रात्रभर ठेवा.
वाफवणे: पीठ फुगून वर आले की त्यात मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा. इडली पात्राला थोडे तेल लावून त्यात पीठ ओता. १०-१२ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. गरम इडल्या चमच्याने काढून घ्या.
 
२. ओल्या खोबऱ्याची चटणी-
साहित्य-
ओले खोबरे: १ वाटी (किसलेले)
फुटाण्याची डाळ (डाळे): २ चमचे
हिरव्या मिरच्या: २-३
आले: १/२ इंच तुकडा
कोथिंबीर: थोडीशी
मीठ: चवीनुसार
फोडणीसाठी: तेल, मोहरी, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची.
 
कृती-
खोबरे, डाळे, मिरच्या, आले, कोथिंबीर आणि मीठ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून फिरवून घ्या. चटणी एका वाटीत काढून घ्या. एका लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीची खमंग फोडणी तयार करा. ही फोडणी चटणीवर ओता. गरमागरम इडली आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: १० मिनिटांत बनवा मऊ आणि लुसलुशीत रवा इडली; पाहा सोपी पद्धत

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments