अर्जेंटिना २४ वर्षांनी फायनलमध्ये

england
साओ पाउलो| wd| Last Updated: गुरूवार, 10 जुलै 2014 (10:25 IST)
फिफा विश्वचषकाच्या दुस-या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध यांच्यात लढत झाली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या ऑरेंज आर्मीशी मेस्सी ब्रिगेडची झूंज असल्याने हा सामना रंगतदार होणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संघांनी अपेक्षेप्रमाणे एकमेकांना काटे की टक्कर दिली.
पहिल्या भागात दोन्ही संघांनी एकमेकांना गोलपोस्टपासून दूरच ठेवले होते. १५ व्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या मेस्सीने मारलेली जबरदस्त किक नेदरलँडचा गोलकिपर सिल्लेसेने रोखली. तर नेदरलँडलाही अर्जेंटिनाची बचाव फळी भेदताच येत नव्हती. नेदरलँडचा स्ट्रायकर अर्जेन रॉबेलकडे चेंडू येताच अर्जेंटिनाचे दोन ते तीन खेळाडू त्याच्या भोवती दिसायचे. तर अर्जेंटिनाच्या मेस्सीलाही नेदरलँडने अशाच पद्धतीने लॉक केले.

दुस-या हाफमध्ये नेदरलँड आणि अर्जेंटिना दोन्ही संघांनी आक्रमकपणे खेळ करुन एकमेकांच्या गोलपोस्टच्या दिशेने हल्लाबोल केला. सामन्याच्या शेवटच्या १५
मिनीटांमध्ये अर्जेंटिनाने गोल करण्यात यश मिळवले खरे मात्र ऑफसाइडमुळे हा गोल अपात्र ठरवण्यात आला. शेवटच्या मिनीटाला नेदरलँडच्या आघाडीवर अर्जेन रॉबेनला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र अर्जेंटिनाच्या बचाव फळीमुळे रॉबेनला गोल करण्यात अपयश आले.

९० मिनीटांमध्ये दोन्ही संघांना गोल मारण्यात अपयश आल्याने अतिरिक्त अर्धा तासाचा वेळ देण्यात आला. मात्र यातही दोन्ही संघांनी गोल केला नाही. शेवटी पेनल्टी शूटद्वारे सामन्याचा निकाल ठरला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर रोमेरोने उत्कृष्ट बचाव करत संघाला अंतिम सामन्यात नेले. रोमेरोने नेदरलँडच्या व्लार आणि वेसली स्नायडर या दोघांनी मारलेल्या किकवर उत्कृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला विजयी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या मेस्सीने संघाला पहिल्याच किकमध्ये यश मिळवून दिले. यानंतर अर्जेंटिनाच्या मॅक्सी रॉड्रीग्जने चौथी आणि निर्णायक किकवर गोल मारुन रोमेरोने रचलेल्या पायावर कळस ठेवला. पेनल्टी शूट आऊटमध्ये नेदरलँडला फक्त दोनच गोल करता आले.
तर अर्जेंटिनाने चारही किकवर
गोल मारल्याने
नेदरलँडचा ४-२ ने पराभव झाला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...