शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रिओ , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (10:42 IST)

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर नीता अंबानी

reliane foundation
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवड झाली आहे. आयओसीमध्ये सदस्यपदी निवडलेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर भारताच्या सदस्या म्हणून नीता अंबानी वयाच्या 70 वर्षांपर्यंत राहणार आहेत. ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याआधी एक दिवस नीता अंबानी यांची निवड झाली आहे. रिओ दि जानेरोमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या 129 व्या सत्रातील बैठकीत त्यांना हे सदस्यत्व देण्यात आले. आयओसीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. जागतिक पातळीवर भारतीचं वाढतं महत्त्व आणि भारतीय महिलांचा हा सन्मान आहे.” असं त्यांनी सदस्यपद मिळाल्यावर सांगितलं.