शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2015 (10:25 IST)

आयलीग व आयएसएल एकत्र करा: भूतिया

sports news
नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली आयलीग ही सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे, तर आयएसएल चांगलीच यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे एकत्रीकरण करावे, असे मत भारताच्या माजी फुटबॉल कर्णधार आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा सल्लागार बायचुंग भूतियाने व्यक्त केले आहे.
 
भूतिया हा भारतीय फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातीत ताईत होता. शंभरापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.