इराणच्या महिला फुटबॉल संघातील ८ खेळाडू निघाले पुरुष!

तेहराण| Last Modified शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2015 (07:37 IST)
इराणच्या महिला फुटबॉल संघातील आठ खेळाडू पुरुष असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने क्रीडा जगतात एकच खळबळ माजली असून, यामुळे इराणच्या फुटबॉल नियामक मंडळावर जगभरातून टीकेची झोड उठत आहे. इराण फुटबॉल महासंघाचे हे कृत्य अनैतिक असल्याची प्रखर टीका अनेकांनी केली आहे. विशेष म्हणजे महिला संघात पुरुष खेळाडूंची वर्णी लावण्याची इराणची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही २0१0 मध्ये इराणच्या संघात चार पुरुष खेळाडू असल्याचे उघड झाले होते. या खेळाडूंना लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला व्हायचे असल्याची सारवासारव मंडळाकडून केली जात आहे. मंडळाचे प्रवक्ते मोज्ताबी शरिफी यांनी स्वत: माध्यमांसमोर याची कबुली दिली, हे विशेष. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर हे खेळाडू महिला होतील. त्यामुळे त्यांना संघात खेळण्यात काहीच अडचण नसल्याचे त्यांचे मत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इराणच्या क्रीडा अधिकार्‍यांनी सर्व संघाची लिंग चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. जनुकीयरीत्या मजबूत खेळाडूंची संघात वर्णी लावण्यासाठीच इराणच्या फुटबॉल नियामक मंडळाने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या हीन कृत्यावर जगभरातू छी-थू केली जात आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...