बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: वारसा , शुक्रवार, 29 जून 2012 (17:30 IST)

जर्मनीस हरवत इटली यूरो कप फायनलमध्ये

यूरो कप फुटबॉल 2012
PTI
PTI
फुटबॉलर मारियो बालोटलीच्या आकर्षक २ गोलच्या मदतीने इटलीने यूरो कप २०१२ फुटबॉल स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये जर्मनीचा २-१ ने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

एक जुलैला होणार्‍या यूरो कप फायनलमध्ये आता इटलीचा मुकाबला पूर्व विजेता स्पेन सोबत होईल. इटलीने पहिल्या हाफ मध्ये दबदबा निर्माण केला आणि बालोटली ने सामन्याच्या २० व्या मिनिटास हेडरने गोल करून संघाचे गोलचे खाते उघडले. त्याने ३६ व्या मिनिटास आपल्या कौशल्याचा नमूना सादर करताना आणखी एक गोल केला.

सामन्यात अंतिम क्षणात (९२ व्या मिनिटास) जर्मनीच्या मेसुत ओजिल ने पेनल्टीवर गोल करत स्कोअर २-१ केला मात्र ओजिलचा हा गोल फक्त सांत्वना देणाराच ठरला.

जर्मनीसाठी पहिला हाफ चांगला राहिला नाही, ते एकदुसर्‍यास पास देण्यात सपशेल अपयशी ठरले.