रविवार, 23 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2015 (10:25 IST)

जोकोविचचा विजयी रथ फेडररने रोखला

rojar fedrar
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा विजयी रथ रॉजर फेडररने रोखल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. एटीपी फायनल्स स्पधा जिंकून वर्षाचे 11वे जेतेपद साजरे करण्याच्या इराद्याने येथे आलेल्या जोकोविचला पराभवाचा धक्का देत फेडररने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवाच्या आधी जोकोविच या स्पर्धेत सलग 15 सामने जिंकला होता.

टेनिस कारकीर्दीत तो सलग 23 सामने जिंकलेला होता. मा‍त्र, त्याचे हे विजयी अभियान रोखताना फेडररने त्याच्याविरुद्धची उपांत्यपूर्व लढत 7-5, 6-2 अशी  जिंकली.