सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 31 जुलै 2012 (17:43 IST)

ज्वाला-आश्विनीने चाखली यशाची चव

ऑलिम्पिक 2012
FILE
भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पाच्या महिला दुहेरी जोडीने लंडन ऑलिम्पिकमध्ये महत्त्वपूर्ण लढतीत चीनी जोडीस पराभूत करत स्पर्धेत आशा कायम ठेवली.

बी गटातल्या सामन्यात ज्वाला व आश्विनीच्या जोडीने चिएन यु चिन व चेंग वान सिंग या जोडीस कडव्या झुंजीत २५-२३, १६-२१, २१-१८ ने हरवले. पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारतीय जोडीस विजय आवश्यक होता. भारतीय जोडीने प्रचंड उतार-चढाव अनुभवलेल्या या सामन्यात महत्त्वपूर्ण छनी धैर्य कायम राखत विजय खेचून आणला. पहिल्या गेम मध्ये त्यांनी तीन गेम प्वाइंट वाचवले आणि शेवटी गेम जिंकून १-० ने आघाडी घेतली.

दुसर्‍या गेम मध्ये विरोधी जोडीने जोरदार वापसी करत भारतीय जोडीच्या चूकांचा फायदा उठवत स्कोअर १-१ ने बरोबरीत आणला. तिसर्‍या व निर्णायक गेम मध्ये ज्वाला व आश्विनीने आघाडी कायम राखत नॉक आउट फेरित प्रवेशाच आशा कायम राखली.

भारतीय जोडीस अंतिम लीग लढतीत शिंता मुलिया सारी व लेई याओ या सिंगापुरच्या जोडीचा सामना करावा लागणार आहे.