1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

भूपतीच्या पुढच्या वर्षी टेनिसला रामराम!

WD
माझी आतापर्यंतची कारकीर्द चांगली राहिली असून, यापुढे माझ्या मुलांना एकटे सोडून कोणताही विदेश दौरा करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी पुढील वर्षी निवृत्त होण्याचा ‍विचार करीत असल्याचे भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपतीने म्हटले.

येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या भूपतीने म्हटले, की मला जगातील महान खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. टॉड वुडब्रिजपासून ते मॅक्स मिरनई आणि लिएंडर पेस ते मार्टिना हिंगिस यांच्यासोबतही टेनिस खेळले आहे. माझी कारकीर्द खरोखरच खूप चांगली राहिली. भूपती सचिन तेंडुलकरबाबत म्हणाला, की टीकाकारांनी सचिनचया निवृत्तीचा निर्णय सचिनलाच घेऊ द्यावा. तो पुढे म्हणाला, की त्याला कोणालाही काहीच सिद्ध करून दाखवायचे नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत शतकांचे शतक करण्याची किमया केली आहे. सचिनबाबत लिखाण करणार्‍यांना त्याची पूर्ण माहितीच नाही. तो योग्य वेळी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेईल, यात शंका नसल्याचेही भूपती म्हणाला.