विश्वनाथ आनंद पाचव्यांदा विश्वविजेता

आनंदी आनंद!

vishwanath anand
मॉस्को| वेबदुनिया| Last Modified गुरूवार, 31 मे 2012 (11:05 IST)
WD
भारताचा ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. आनंदने इस्त्रायलयच्या बोरिस गोल्फंड याचा टायब्रेकरमध्ये पराभव करून सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. आनंदने टायब्रेकरच्या 4 संघर्षपूर्ण रॅपिड गेम्सपैकी 2 गेम्समध्येविजय मिळवून पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. नियमित 12 सामन्यांनंतर दोघेही प्रत्येकी 6 गुणांसह बरोबरील राहिले होते. या विजयानंतर आनंदला 14 लाख मिळणार आहे.

जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी पांढर्‍या मोहर्‍यांकडून विश्‍वनाथन आनंदला निव्वळ बरोबरी हवी होती. आणि गेल्या अनेक वर्षात आनंद पांढर्‍या सोंगट्यांनी क्वचितच हरला होता. आनंदचे जगज्जेतेपद निश्‍चित करणारा चौथा डाव सुरु झाला.
पुन्हा एकदा आनंदने सिसिलिअन बचावाच्या मुख्य प्रकारांना बगल दिली आणि उंटाचा शह दिला. ही पद्धत मोस्को पद्धत म्हणून ओळखली जाते. मुख्य म्हणजे या प्रकाराविरुद्ध जिंकणे काळ्य़ाला खूप कठीण जाते. सुरु वातीलाच वजिरावजिरी करून आनंदने गेलफांडच्या हल्ल्यातील हवाच काढून घेतली. गेलफांडकडे दोन उंटांचा वरचष्मा असला तरी डावात प्याद्यांची साखळी लावून आनंदने दोन्ही उंट जखडून ठेवले. यापुढे आपण टीकू शकणार नाही याची जाणिव होताच त्याने बरोबरीचा प्रस्ताव पुढे केला आणि आनंद २.५ वि. १.५ अशा गुणांनी पाचव्यांदा जगज्जेता ठरला.
आनंदला ६.५ कोटी.
या स्पर्धेसाठी एकूण २.५५ दशलक्ष डॉलर (सुमारे १३ कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम होती. १२ डावात आनंदने विजय मिळविला असता तर त्याला त्यापैकी ६0 टक्के रक्कम मिळाली असती. पण टायब्रेकरमध्ये निकाल लागल्याने आनंदला ५५ टक्के १.४ दशलक्ष डॉलर तर (सुमारे ६.५ कोटी) तर उर्वरित रक्कम गेलफांडला मिळाली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...