सरिता देवी, शिवा थापाला संधी

नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (09:14 IST)
शिवा थापा तसेच एक वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारी एल. सरिता देवी यांच्यासह तेरा खेळाडूंचा भारतीय संघ चीनमध्ये बॉक्सिंगचा सराव व स्पर्धा करिता जाणार आहे. या दौ-यास एक डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे.

भारतीय संघ तेरा दिवसांचा दौरा करणार असून, त्यामध्ये क्विनान येथे होणा-या आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत चीन, थायलंड, मंगोलिया व दक्षिण कोरियाच्या स्पर्धकांचा समावेश असेल. भारतीय संघात दहा पुरुष व तीन महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मार्चमध्ये होणा-या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी हा स्पर्धात्मक सराव भारतीय खेळाडूंना उपयुक्त ठरणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग यांनी सांगितले, या दौ-यात स्पर्धेचाही समावेश असल्यामुळे खेळाडूंना खूपच फायदा होणार आहे. या स्पर्धेत अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्यामुळे त्यांच्याकडून आमच्या खेळाडूंना खूप काही शिकावयास मिळणार आहे.


भारतीय संघ : पुरुष-एल. देवेंद्रसिंग (४९ किलो), गौरव बिधुरी (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनीष कौशिक (६० किलो), थॉमस मतेई (६४ किलो), मनदीप जांगरा (६० किलो), विकास कृष्णन (७५ किलो), कुलदीपसिंग (८१ किलो), अमृतप्रीतसिंग (९१ किलो), नरेंद्रकुमार (९१ किलोवर), महिला : पिंकी जांगरा (५१ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), पूजा राणी (७५ किलो).


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...