सोमवार, 27 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (10:05 IST)

सानिया-हिंगीसची सायकल रिक्षा सवारी

सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस सायकल रिक्षा सवारी
वुहान- महिला दुहेरी जागतिक मानांकन यादीतील अव्वलमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस यांनी वुहान स्पर्धेत अजिंक्यपद काबीज केल्यानंतर सायकल रिक्षा सवारी करत त्याचा आनंद साजरा केला.

जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांनी शहरातील रस्त्यांवरून सायकल रिक्शाने फेरफटका मारला. यावेळी सानियाने रिक्शांचे सारथ्य केले आणि मार्टिना हिंगीसने या सवारीचा पुरेपूर आनंद लुटला. उभयतांनी आपल्या या खास रिक्षा सवारीला नाव दिले सेंटिना.