सिनसिनाटीचे फेडररला सहावे जेतेपद

rojer fedrar
ओहिओ| wd| Last Modified मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (12:55 IST)
सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने पुरुष एकेरीचे अभूतपूर्व असे सहावे विजेतेपद मिळविले.
महिला एकेरीत अमेरिकेची जगात अव्वलस्थानी असलेली टेनिसपटू सेरेना विलिअम्स हिने प्रथमच सिनसिनाटी स्पर्धा जिंकली. हार्डकोर्ट टेनिसवर या दोघांनी यश मिळविले. लवकरच अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळली जाणार आहे. त्या स्पर्धेसाठी हे विजेतेपद या दोघांनाही प्रोत्साहन देणारे ठरू शकेल.

फेडररने त्याच्या टेनिस कारकिर्दीतील 80 वी स्पर्धा जिंकली. याच स्पर्धेत त्याने एक हजार मास्टर्स टेनिस स्पर्धेचा 300 वा सामना जिंकून इतिहास घडविला. या स्पर्धेत त्याने त्याच्या 33 वा वाढदिवस उत्साहात विजयाने साजरा केला होता.
जगात तिसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लडच्या फेडररने सिनसिनाटीचे सहावे विजेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात स्पेनच्या डेव्हीड
फेरर याचा 6-3, 1-6, 6-2 अशा तीन सेटनंतर पराभव केला. फेडररने सहा बिनतोड आणि विजयी सर्व्हिस केल्या. त्याने पहिल्या सर्व्हिसवर 76 टक्के गुण मिळविले त्याला हा अंतिम विजय मिळविण्यासाठी एक तास 42 मिनिटे लागली. फेडररने फेररविरुध्दचे सर्वच सर्व 16 सामने जिंकले आहेत.
या स्पर्धेत जेवढय़ा वेळी फेडरर अंतिम फेरीत पोहोचला त्यावेळी त्याने स्पर्धा जिंकली आहे. मी अलीकडे देशाला लहान पदके मिळवून दिली. परंतु सिनसिनाटीचा मोठा चषक जिंकल्यान मला आनंद झाला आहे, असे फेडरर म्हणाला. फेडररने येथील आपली अजिंक्यपदाची मालिका कायम राखली.

उपान्त्य फेरीत फेडररने मिलोस रावोनिक याचा तर डेव्हीड फेररने जुलीन बेन्नेटय़ू याचा पराभव केला होता.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा
देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत ...