गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , सोमवार, 5 जून 2017 (12:27 IST)

पुनरागमन जोकोमुळे - आंद्रे आगाशी

Andre Agassi
प्रदीर्घ कालखंडानंतर व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमकाचे  श्रेय नोवाक जोकोविचलाच जाते, असे अमेरिकेचा माजी दिग्गज टेनिसपटू आंद्रे आगासी म्हणाला. अलीकडेच आंद्रे आगासी द्वितीय विश्वमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविचचा प्रशिक्षक झाला आहे. गत काही काळापासून जोकोविच फॉर्मसाठी संघर्ष करीत असला तरी तो लवकरच आपला पुढील ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकणार आहे. असा विश्वास 47 वर्षीय आगासीने व्यक्त केला आहे. जोकोविच एक विजेता म्हणून या टेनिस कोर्टवर उतरला आहे. तो एक उत्तम व्यक्ती आहे. जर मी त्याला काही मदत करू शकत असेल, तर मी त्याल निश्‍चित करेल. तो पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचेल, असा विश्वासही आगासीने व्यक्त केला.