Asian Games 2023: रोहन आणि रुतुजा जोडीने टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक पटकावले
Asian Games 2023: भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी दुसरा सेट 6-3 असा जिंकून पुनरागमन केले. मात्र, तिसरा सेट टायब्रेक झाला. तत्पूर्वी, चायनीज तैपेईनेही भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये पराभूत केले पण अखेरीस भारताने जिंकून सुवर्णपदक पटकावले.
रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सलामीचा सेट 2-6 असा गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले. त्यांनी सुपर टायब्रेक 10-4 असा जिंकला. 2002 च्या आशियाई खेळापासून या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा भारताचा सिलसिला कायम आहे. रोहन बोपण्णा आता दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन आहे! त्याने 2018 मध्ये दिविज शरणसह पुरुष दुहेरी जिंकली आणि आता रुतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.
Edited by - Priya Dixit