गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:02 IST)

Badminton Asia Championships: सायना नेहवालने सलामीचा सामना जिंकला, लक्ष्य सेन पहिल्या फेरीतून बाहेर

Badminton tournament
लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधील पहिला सामना जिंकला आहे. दुसरीकडे पुरुष विभागात लक्ष्य सेन आणि बी साई प्रणीत यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सायनाने दक्षिण कोरियाच्या सिम युजिनचा 21-15, 17-21, 21-13 असा पराभव केला. दुसरीकडे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन चीनच्या बिगरमानांकित ली शी फेंगविरुद्ध अपसेटला बळी पडला.
 
56 मिनिटे चाललेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पाचव्या मानांकित लक्ष्यला 21-12, 10-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या प्रणीतला इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टीकडून 17-21, 13-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.