मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (11:06 IST)

मारिया शारापोव्हा लवकरच आई होणार

tennis
माजी टेनिस स्टार मारिया शारापोव्हाने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. शारापोव्हाने तिच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तिचा खास फोटो शेअर करताना ही माहिती दिली आहे. शारापोव्हा पहिल्यांदाच आई होणार आहे. तिने आपल्या टेनिस कारकिर्दीत अनेक मोठी कामगिरी केली. पाच वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या शारापोव्हाने2020 मध्ये टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. ती सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर तिचे 42 लाख फॉलोअर्स आहेत. 
 
2020 च्या डिसेंबर महिन्यात, मारिया शारापोव्हा आणि ब्रिटीश उद्योगपती अलेक्झांडर यांनी खुलासा केला की दोघांचीही एंगेजमेंट झाली आहे. टेनिस कोर्टवर रशियाचे प्रतिनिधित्व करणारी शारापोव्हा टेनिसमध्ये कारकिर्दीला सुरुवात करताच अमेरिकेत गेली. यानंतर 2020 मध्ये तिने अलेक्झांडरसोबत लग्न केले.

अलेक्झांडर हे ब्रिटनमधील प्रसिद्ध उद्योगपती असून ते न्यूयॉर्कशीही संबंधित आहेत. मारिया शारापोव्हाने 2020 मध्ये टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.जागतिक टेनिस क्रमवारीत सलग 21 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.तिच्या लाखो चाहत्यांनी आणि मित्रांनी तिला या चांगल्या बातमीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.