मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 (17:54 IST)

पुणे जिल्ह्यात 3 नवीन महानगरपालिका स्थापन होणार-अजित पवार

3 new municipal corporations to be established in Pune district
पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे . आज पहाटे अजित पवार हे चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आले आता त्यांनी ही माहिती दिली. 
सध्या पुण्यात वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत आहे. चाकण, हिंजवडी आयटी आणि ऑटो हब आहे येथे अनधिकृत बांधकामे आणि होणाऱ्या वाहतूकच्या बोज घेण्यासाठी ग्राम पंचायत सक्षम नाही.या मुळे त्यांनी तीन महापालिका करण्यावर भर दिला
आणि कोणाला आवडो किंवा नाही तरीही मी तीन नवीन महानगर पालिका स्थापन करणार असा इशारा दिला आहे. तसेच चाकण परिसरात एक महापालिका, हिंजवडी परिसरात एक महापालिका आणि फुरसुंगी, मांजरी, उरळी परिसरात एक महापालिका करण्याचे त्यांनी जाहीर केले 
तळेगाव ते शिक्रापूरमार्गाला सहापदरी करून पुणे-नाशिक एलिव्हेटेड मार्ग करून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्त करण्याचे ते म्हणाले
 
Edited By - Priya Dixit