सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (11:55 IST)

BWF World Championships 2022 बी साई प्रणीत तैवानच्या शटलरकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर

B Sai Praneeth
भारतीय बॅडमिंटन स्टार बी साई प्रणीत BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 च्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आधीच बाहेर झाला आहे. टोकियो येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेदरम्यान त्याला तैवानच्या चाऊ टेन चेनने पराभूत केले. चौथ्या मानांकित तैवानच्या खेळाडूने प्रणीतचा तीन सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट 21-15 असा गमावल्यानंतर प्रणीतने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत चौ टेन चेनचा 15-21 असा पराभव केला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये तैवानच्या खेळाडूने 21-15 असा विजय मिळवत सामना जिंकला. या पराभवासह साई प्रणीत स्पर्धेबाहेर झाला आहे.
 
2019 मध्ये झालेल्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रणीतने कांस्यपदक पटकावले होते. चायनीज तैपेईच्या शटलरविरुद्ध प्रणितचा हा सलग पाचवा पराभव आहे. तिसऱ्या सेटमध्ये तो 4-10 असा मागे पडला. असे असूनही, त्याने काही पुनरागमन केले, परंतु शेवटी निकाल तैवानच्या शटलरच्या बाजूने गेला.
 
यापूर्वी महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी जोडीने मालदीवच्या शटलर्सचा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.