रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सिंधूसोबत खेळण्यासाठी उतावीळ कॅरोलीन

पी. व्ही. सिंधूसोबत खेळण्यासाठी उतावीळ कॅरोलीन
रिओ ऑलिंपिकमध्ये भारताच्या पी. व्ही सिंधूला पराभूत करणारी स्पेन ची बॅडमिंटनपटू कॅरोलीन मरीन पुन्हा पी. व्ही. सिंधूसोबत खेळण्यासाठी उतावीळ झाली आहे. आपल्याला पुन्हा सिंधूसोबत खेळण्याची प्रतीक्षा असल्याचे तिने म्हटले आहे.
भारतात होणार्‍या प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये ती खेळणार आहे. येत्या एक जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. सायना ही अनुभवी व खेळात विविधता असलेली बॅडमिंटनपटू आहे तर पी. व्ही. सिंधू आक्रमक असल्याचे मरीनने म्हटले आहे.