शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (22:48 IST)

CWG 2022 Day 9 : रवी दहिया नंतर विनेश फोगाटनेही सुवर्णपदक जिंकले

vinesh phogat
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 33 पदके जिंकली आहेत. यामध्ये 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज प्रियांकाने 10,000 मीटर चालण्यात, अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये आणि पुरुष संघाने लॉन बॉलमध्ये रौप्यपदक जिंकले. उपांत्य फेरीतील पराभवानंतर जास्मिनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रवी दहिया आणि विनेश फोगाट यांनी कुस्तीत सुवर्णपदक जिंकले.
 
दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाटने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली आहे. विनेशने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. तिने 53 किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना 4-0 ने जिंकला. तिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48kg आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 50kg गटात सुवर्णपदक जिंकले.
 
भारताचे
11 सुवर्ण:  मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट
 11 रौप्य संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ
11 कांस्य  : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर सिंग, लवप्रीत सिंग, कौर सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत