बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

दीपाचे लक्ष टोकियो ऑलिम्पिकवर

Rio olympic
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविना असलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट आता पूर्णपणे तंदुरूस्त झाली असून तिने 2020 साली टोकियोत होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी आतापासूनच जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे.
 
पुढीलवर्षी होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपाचे पदक प्राप्तीसाठी पहिले लक्ष राहिल. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाचे जिम्नॅस्टमधील पदक थोडक्यात हुकले होते. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच सहभागी होणारी दीपा कर्माकर ही पहिली महिला जिम्नॅस्ट आहे. मध्यंतरी दीपाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी तिला बराच कालावधी लागला.