गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रोम , शनिवार, 20 मे 2017 (09:57 IST)

नदाल, जोकोविक उपांत्यपूर्व फेरीत

क्ले कोर्टचा बादशहा रफाएल नदाल सहित नोवॅक जोकोविक आणि व्हिनस विलियम्स यांनी रोम मास्टर्सच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. मात्र, स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉवरिंकाचे आव्हान संपुष्टात आले. जोकोविकने स्पेनचा रॉबटरे बॅस्टिस्टा आगुटचा ६-४ आणि ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. पुढच्या फेरीत जोकोविकला अज्रेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रोचे आव्हान असेल. नदालने अमेरिकेचा ज्ॉक सोकला ६-३ आणि ६-४ असे नमवले. वॉवरिंकाला अमेरिकेचा जॉन इसनरने चुरशीच्या झालेल्या सामन्यात ७-६ आणि ६-४ असे पराभूत केले.