1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. dy patil stadium, Mumbai

डीवाय पाटील स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज!

नवी मुंबई- 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे. देशातील दर्जेदार स्टेडियमपैकी डीवाय पाटील स्टेडियम हे एक असून विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचा विश्वास फिफा स्पर्धाप्रमुख जेमी यार्जा यांनी व्यक्त केला. फिकाच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमची पाहणी केली, त्यावेळी यार्जा बोलत होते.
 
या प्रसंगी फिफा स्पर्धा संचालक झेवियर सेप्पी, वेस्टर्न इ‍ंडिया असोशिएनचे सीईओ हेनी मेनेनेझ, स्टेडियमचे अध्यक्ष विजय पाटील, नवी मुंबई महा‍पालिकेची अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उपस्थित होते.
पुढील लेख
जीपीएसचा वापर करत असल्यास सावधान...