शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (20:47 IST)

FIFA World Cup: कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषक बद्दल जाणून घ्या

या वर्षाच्या अखेरीस कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 27 देशांनी त्यांचे स्थान निश्चित केले आहे. पाच जागांसाठी लढत सुरू आहे. विश्वचषकापूर्वी ड्रॉ सुरू राहणार आहे. ड्रॉ झाल्यानंतरच कोणते संघ कोणत्या गटात आहेत हे कळेल. प्री-क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये कोण कोणाशी मुकाबला करू शकतो आणि कोणते संघ एकमेकांसमोर येऊ शकतात. जाणून घ्या.
 
विश्वचषक 2022 च्या गट टप्प्यातील ड्रॉ शुक्रवारी (1 एप्रिल) IST रात्री 9:30 वाजता होईल. हा ड्रॉ कतारमधील दोहा एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ड्रॉ दरम्यान प्रत्येकी चार संघांचा आठ गटात समावेश केला जाईल.
 
भारतातील विश्वचषक स्पर्धेचे हक्क वायाकॉम 18 कडे आहेत. हिस्ट्री TV19 HD सह व्हूट सिलेक्ट अॅपवर ड्रॉ थेट पाहता येईल. याशिवाय फिफा आपल्या यूट्यूब चॅनल, अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह दाखवेल.
 
ग्रुप स्टेजमध्ये सर्व संघांना तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. अ गटातील विजेत्याची प्री-क्वार्टर फायनलमध्ये ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी सामना होईल. त्याचवेळी अ गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेला संघ ब गटातील विजेत्याशी सामना करेल. हाच नियम ग्रुप सी-डी, ग्रुप ई-एफ आणि ग्रुप जी-एच यांना लागू होईल.
 
कतार, जर्मनी, डेन्मार्क, ब्राझील, फ्रान्स, बेल्जियम, क्रोएशिया, स्पेन, इंग्लंड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, अर्जेंटिना, इराण, दक्षिण कोरिया, जपान, सौदी अरेबिया, इक्वेडोर, उरुग्वे, कॅनडा, घाना, सेनेगल, पोर्तुगाल, पोलंड, मोरोक्को, ट्युनिशिया, कॅमेरून. य संघांनी विश्वचषक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
 
21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ग्रुप स्टेजचे सामने होणार आहेत. यानंतर 3 ते 6 डिसेंबर दरम्यान उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 9 आणि 10 डिसेंबरला होतील. उपांत्य फेरीचे सामने 13 आणि 14 डिसेंबर रोजी खेळवले जातील. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना 17 डिसेंबरला होणार आहे. यानंतर 18 डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे.