1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: तुरिन , मंगळवार, 24 मार्च 2020 (13:57 IST)

फुटबॉल खेळाडू डायबालाला कोरोना

Football player
इटालियन क्लब ज्युवेंट्‌सचा स्टार फुटबॉल खेळाडू पाउलो डायबाला आणि त्याची गर्लफ्रेंड कोरोना व्हायरसने संक्रमित आढळली आहे. अर्जेंटिनाचा फॉरवर्ड खेळाडू असलेला डायबाला ज्युवेंट्‌स क्लबचा तिसराखेळाडू आहे. ज्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. 
 
जगभरात पसरलेल्या कोरोनाचे सर्वात जास्त लोक इटलीमध्ये आहेत. डायबालाने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सांगितले की तो व त्याची गर्लफ्रेंड ओराना सेबाटिनी ही कोरोना संक्रमित आहे. सेबाटिनी ही अर्जेंटिनाची गायिका व मॉडेल आहे.