ठाण्यात कौटुंबिक वादातून भाच्याने केली मामाची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
ठाण्यातील कल्याणमध्ये एका कौटुंबिक वादाने भयानक वळण घेतले. संतप्त झालेल्या भाच्याने त्याच्या मामाचे डोके पायऱ्यांवर आपटून हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील मोहने परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव 40 वर्षीय मरियाप्पा राजू नायर असे आहे. मृताचा भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा -भाच्यांमध्ये काही काळांपासून कटुंबिक वाद सुरु होता. तो हळू हळू वाढत गेला त्यातून दोघांचा वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि आरोपी गणेशने रागाच्या भरात येऊन आपल्या मामालाजवळच्या रुग्णालयात ओढत नेले आणि त्यांचे डोके पायऱ्यांवर आपटून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात मयत मॅरियप्पाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आरोपी गणेशने त्याला बचाव करू दिला नाही आणि बेदम मारहाण सुरु ठेवली. या मारहाणीत मरियप्पाचा मृत्यू झाला.
आरोपी गणेशने तिथून पळ काढला. घटनेनंतर रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरु केले. खडकपाडा पोलिसांनी आरोपी गणेशला कल्याण रेल्वे स्थनाकावरून एका तासाच्या आत अटक केली. प्राथमिक तपासात हे घरगुती वादातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
Edited By - Priya Dixit