बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (08:07 IST)

एलोर्डा चषक बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरीत निखत जरीनसह चार बॉक्सर्स

nikhat zarin
वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनने एलोर्डा कप बॉक्सिंगच्या 52 वजनी गटात कझाकिस्तानच्या तोमिरिस मिर्झाकुलचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांच्याशिवाय मीनाक्षी (48), अनामिका (50), मनीषा (60) यांनीही उपांत्य फेरीचे सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.
 
मीनाक्षीने कझाकिस्तानच्या गुलनाज बुरीबाएवाचा तर मनीषाने त्याच देशाच्या तंगातार एसेमचा 5-0 असा पराभव केला. तर अनामिकाने कझाकिस्तानच्या गुलनारचा पराभव केला. गुलनार यांना तीन इशाऱ्यांनंतर अपात्र ठरवण्यात आले. तर सोनू (63) आणि मंजू बांबोरिया (66) यांना उपांत्य फेरीत पराभूत होऊन कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.शनिवारी अंतिम सामने होणार आहेत.

Edited by - Priya Dixit