युवा बॉक्सर्सची उत्कृष्ट कामगिरी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारून पदकांची कमाई
भारतीय युवा बॉक्सर्सनी आशियाई अंडर-22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि देशासाठी तीन पदके निश्चित केली आहेत. ब्रिजेश टमटा, सागर जाखर आणि सुमित यांनी या युवा चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारून पदकांची कमाई केली आहे
ब्रिजेशने (48 किलो) उझबेकिस्तानच्या साबिरोव सैफिदिनचा पराभव केला. दोन्ही बॉक्सरने प्रत्येकी एक फेरी जिंकली, पण तिसऱ्या फेरीत भारतीय बॉक्सरने 4-3 असा विजय मिळवला. सागर (60 किलो) आणि सुमित 67 किलो) यांनी अनुक्रमे थायलंडच्या कलासीराम टी आणि कोरियाच्या हाँग सेओ जिन यांचा 5-0 असा पराभव केला. जितेशला 54 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या टी नुरसिलने 5-0 ने पराभूत केले.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती (54 किलो) मंगळवारी उझबेकिस्तानच्या उख्तामोवाशी खेळणार आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाने या स्पर्धेसाठी 50 सदस्यांचा संघ पाठवला आहे. यामध्ये 25 वजनी गटात 24 देशांतील 390 हून अधिक बॉक्सर सहभागी होत आहेत.