बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , सोमवार, 11 जून 2018 (10:59 IST)

राफेल नदालला अकरावे विजेतेपद

स्पेनचा जागतिक अग्रमानांकीत खेळाडू राफेल नदाल याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिए याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करून फ्रेंच ग्रँडस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. 
 
नदालचे हे क्लेकोर्टवरील अकरावे विजेतेपद ठरले. नदालने हा विक्रमच केला आहे. त्याचप्रमाणे नदालने तीन सरळ सेटमध्ये अंतिम सामना जिंकला आहे. नदालने थिएचा 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला. हा सामना विलक्षण असा रंगला. पहिला सेट नदालने 6-4 ने घेतला. दुसरा सेटही तने 6-3 ने घेतला, परंतु तिसरा सेट जिंकणसाठी मात्र नदालला कष्ट उचलावे लागले. तिसर्‍या सेटमधील आठव्या गेममध्ये दोघांमध्ये रंगत दिसून आली. नदालने 15-0, 30-0, 40-0 अशी आघाडी घेतली. त्याला मँच पॉईंट आणि सेट पॉईंट घेण्याची गरज होती. परंतु थिएने 40-40 अशी बरोबरी साधली. त्यानंतर कधी नदालला अ‍ॅडव्हाटेंज तर कधी ड्यूस अशी स्थिती झाली. शेवटी नदालने अ‍ॅडव्हाटेंज फायदा घेत सेट आणि सामना जिंकला. 
 
नदालने तच कारकिर्दीतील एकूण 17 वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेची अकरावेळा अंतिम फेरी गाठणारा आणि ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने स्वीस खेळाडू रॉजर फेडररला मागे टाकले आहे. फेडररने विम्बलडन स्पर्धेत 11 वेळी अंतिम फेरी गाठली होती. नदालने फ्रेंच  टेनिस स्पर्धेतील 86 वा विजय मिळविला आहे. 
 
थिएम हा 1995 नंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा ऑस्ट्रियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. 1995 साली थॉमस स्टरने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत जोकोविकला नमविणार्‍या मार्कोवर थिएमने विजय मिळविला होता. नदालने अर्जेंटिनाच्या जूआन डेल पोट्रोचा दुसर्‍या उपान्त्य  सामन्यात पराभव केला होता. 29 वर्षांच्या नदालने सर्व्हिस करताना 29 वर्षांच्या थिएवर मात केली. थिएम हा म्हणावा तसा प्रतिकार करू शकला नाही.