बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

मुख्यंमत्री खट्टर यांच्याकडून योगेश्वरला लग्नात अनोखे गिफ्ट!

चंदीगड- लंडन ऑलिम्पिकला कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लग्नबंधनात अडकला आहे. हुंड्याच्या प्रथेला फाटा दिल्याने योगेश्वर आधीपासूनच चर्चेत आहे. योगेश्वरने शुभशकुन म्हणून केवळ एक रूपये हुंडा स्वीकारून देशवासीयांची मने जिंकली.
 
योगेश्वरच्या विवाह सोहळ्याला ‍हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरसह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री खट्टर यांनी योगेश्वर दत्तला अनोखे गिफ्ट दिले. खट्टर यांनी योगेश्वरला गावाच्या विकासासाठी 10 कोटी इपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
 
योगेश्वरने देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्याच्या गावकर्‍यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. गावात महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.