1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:16 IST)

Olympics साठी प्रेक्षकांना आरोग्याचे अ‍ॅप अनिवार्य !

Olympic audience
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत परदेशी प्रेक्षकांना आरोग्यासंबंधी अॅप वापरणे सक्तीचे होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. मात्र परदेशी प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य संबंधित ‘अ‍ॅप’ असणे आवश्यक असू शकते.
 
परदेशी प्रेक्षकांच्या आरोग्यासंबंधीच्या ‘अ‍ॅप’ सक्तीबाबत जाहीर प्रतिक्रिया ऑलिम्पिकच्या संयोजन समितीकडून आली नाही. मात्र याबाबद निर्णय आल्यास तेथील नागरिकांना दिलासा मिळेल कारण अन्य देशांच्या तुलनेत जपानने करोना संसर्गावर चांगलेच नियंत्रण मिळवले आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी मोठ्या प्रमाणात नियंत्रण प्रेक्षक एकत्र झाल्यास करोना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती समजते.