मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:50 IST)

काय म्हणता, देशात जपानी कृषि तंत्रज्ञानाने संत्रा, मोसंबी, ऊसची लागवड होणार

बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील पिके,पिकांना मिळणाऱ्या बाजारपेठेवर विपरीत परीणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक क्षमता अधिक असणाऱ्या, कमी पाण्यावर उगवणाऱ्या द्राक्ष, ऊस, संत्रा सारख्या जपानी पिकांची महाराष्ट्रात लागवड करण्यात येणार आहे. यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातुन जपानच्या कृषितज्ञांसमवेत बारामतीत पहिली बैठक पार पडली. येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट लवकरच त्यासाठी कृषि आराखडा तयार करणार आहे.
 
जपानमध्ये द्राक्षासह संत्रा, मोसंबी, ऊस या पिकांची लागवड होते. ही पिके रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारी आहेत. कमी पाण्यावर अधिक दर्जेदार उत्पादन देण्यासाठी जपानी कृषि तंत्रज्ञान नावाजलेले आहे. शिवाय जपान संपुर्ण जगात तंत्रज्ञानासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे जपानच्या कृषी आणि यांत्रिकीकरणाचे तंत्रज्ञान महाराष्ट्राच्या मातीत रुजविण्याबाबत एैतिहासिक चर्चा यावेळी झाली. येथील कृषि विज्ञान केंद्रात इस्त्राईल,नेदरलँडच्या प्रगत संशोधनाचा अवलंब करण्यात यशस्वी प्रयोग झाले आहेत. आता जपानी तंत्रज्ञानाचा यशस्वी अवलंब करण्यास महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.