तैवानचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख करु नका, चीनचा इशारा
तैवानचा राष्ट्रीय दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला तैवानचा राष्ट्रीय दिवशी या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करुन नये असा इशारा दिला आहे.
दिल्लीतील चीनच्या भारतीय दुतावासाने भारतातील प्रसारमाध्यमांना एक चिठ्ठी पाठवली असून त्यात आठवण करुन दिली आहे की जगामध्ये चीन का एकमेव आहे. जगभरामध्ये चीनचे प्रतिनिधित्व केवळ पिपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे सरकार करते. त्यामुळेच तैवान स्वतंत्र्य देश असल्याचा उल्लेख करु नका.
चीनची अपेक्षा अशी असली तरी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका ट्विटमधून चिनी प्रसारमाध्यमांना आणि जिनपिंग सरकारला जश्यास तसं उत्तर दिलं आहे.