सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (16:18 IST)

डोनाल्ड ट्रम्प सुदैवाने विमान अपघातातून बचावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुदैवाने विमान अपघातातून बचावले आहेत. वॉशिंग्टन विमानतळावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या अगदी जवळून एक ड्रोन सारखे सदृश्य उपकरण गेले. पण सुदैवाने ट्रम्प यांच्या विमानाचा मोठा अपघात टळला. हा प्रकार विमान विमानतळावर लँडिंगच्या तयारीत असताना घडला. यादरम्यान विमानात अनेक जण होते.
 
माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे एअरफोर्स वन लँड होत असताना पिवळ्या आणि काळ्या रंगाचं एक उपकरण विमानाच्या अगदी जवळ आले होते. ते उपकरण विमानाच्या उजव्या बाजूला धडकणार होते. पण हा मोठा अपघात टळला. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने सिक्रेट सर्व्हिसकडे अहवाल मागवला आहे.