शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (17:52 IST)

या ग्रहामुळे उद्भवतात भयंकर रोग, बचावाचे उपाय जाणून घ्या

कुंडलीत पीडित ग्रह अनेक समस्यांचे कारण बनतात आणि यामुळे आजार देखील उद्भवतात. ज्योतिष शास्त्रात कुंडलीत ग्रह पीडित असल्यास आमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम दिसून येतात. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की कोणत्या आजारासाठी कोणते ग्रह जवाबदार आहेत ते आणि त्यावर कोणते उपाय अमलात आणता येऊ शकतात-
 
सूर्य
कुंडलीत सूर्याचे अशुभ फल व्यक्तीच्या डोळ्या आणि मेंदू संबंधी आजार दर्शवतात.
सूर्यदेवाची शुभता वाढविण्यासाठी आणि त्याची नाराजी दूर करण्यासाठी कधीही खोटे बोलू नये. याने सूर्य दोष दूर होतात.
 
चंद्र 
कुंडलीत चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला पोट आणि कफ संबंधी आजार होण्याची शक्यता असते.
चंद्राची शुभतेसाठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. स्वयं स्वच्छ राहावे आणि जवळपासचं वातावरण स्वच्छ ठेवावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
 
मगंळ
मंगळचा प्रभाव लाल रंगावर अत्यधिक असतो आणि मंगळ अशुभ असल्यास रक्तासंबंधी आजार उद्भवतात.
मंगळ कृपा मिळविण्यासाठी रविवारी गव्हाच्या कणकेत गूळ घालून सेवन करावे आणि इतरांनाही खाऊ घालावे.
 
बुध
कुंडलीत बुध ग्रह अशुभ फल देत असल्यास दात आणि नसांसंबंधी आजार होण्याची शक्यता असते.
बुधाची शुभतेसाठी गायीला हिरवी गवत खाऊ घालावी.
 
गुरु
कुंडलीत गुरुच्या अशुभतेमुळे श्वासासंबंधी आजार उद्भवू लागतात. 
बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करावे आणि गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
 
शुक्र
शुक्र संपन्नता आणि वैभवच प्रतीक आहे. परंतू शुक्र अशुभ असल्यास अनेक आजार उद्भवतात.
शुक्राची शुभता मिळवण्यासाठी गायीला पोळी खाऊ घालावी.
 
शनी
कुंडलीत शनी ग्रह अशुभ फल देत असल्यास पोटासंबंधी आजार उद्भवतात.
शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी मेहनती लोकांना कपडे, धन, अन्न दान केल्याने शुभता मिळेल.
 
राहू
कुंडलीत राहू अशुभ असल्यास वारंवार ताप येऊन तब्येत बिघडत असते.
शुभतेसाठी निर्धन, गरजू, सफाई कर्मचारी किंवा कुष्ठ रोगींना भोजन देऊन प्रसन्न करावे.