शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (21:22 IST)

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी

केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे. 
 
हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर उतरलं. यात १९१ प्रवासी होते. अद्याप अपघाताचे कारण कळू शकलेले नाही. एअर इंडियाकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. 
 
या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत ते देखील अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहीतीने समजण्यात येत आहे. 
 
या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहे.