बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (14:00 IST)

बीडमध्ये व्हेंटिलेटर बंद पडल्याने करोना रुग्णाचा मृत्यू

बीडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांची तडफड सुरू आहे तर नातेवाईकांची धावपळ सुरू असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 72 वर्षीय रुग्णाचा मृत्यू कृत्रिम श्वसन यंत्र बंद पडल्यानेच झाल असा आरोप करत चौकशीची मागणी मृत रुग्णाच्या मुलाने केली आहे.
 
गेवराई येथील 72 वर्षीय वृद्धावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने कक्षातील व्हेंटिलेटर बंद पडल्याने वृद्ध रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुमारे अर्धा तास कृत्रिम श्वसन यंत्र बंद असल्याने वृध्द रुग्ण बेशुद्ध झाला आणि गुरुवारी रात्री अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. 
 
नंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात कृत्रिम श्वसन यंत्र बंद पडल्यानंतर वृध्द रुग्ण कशा पद्धतीने मदतीसाठी हाक देत असून त्यांना होत असलेला त्रासही स्पष्ट दिसत आहे. यामुळे सरकारी रुग्णालयातील कारभार समोर आला आहे. दरम्यान डॉक्टर तेथे असून पर्याय नसल्यामुळे त्यांना काय करावे हे समजत नव्हतं.
 
विजेची अद्यावत सोय नसल्याने शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 738 वर पोहचलाय तर आतापर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.