बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सेऊल , शनिवार, 2 मे 2020 (10:22 IST)

किम जोंग उन निरोगी आहेत, 20 दिवसांनी बहिणीसोबत‍ दिसले

मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याचे वृत्त फिरत होते. यामुळे जगभरात मोठी खळबळ निर्माण झाली. मात्र, शुक्रवारी तब्बल २१ दिवसांनंतर किम जोंग उन हे सर्वांसमोर आले आहेत. यामध्ये किमची तब्येत ठणठणीत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. यावेळी किमची बहीण किम यो जोंग देखील उपस्थित होती.
 
यावेळी किम यांनी छोटेखानी भाषण केलं आणि कारखान्याच्या माध्यमातून देशाच्या विकासात कशी भर घातली जातेय, याबाबत मत मांडलं. उत्तर रियातल्या रासायनिक उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचं कौतुकही त्यांनी यावेळी केलं, असं KCNA नं आपल्या वृत्तात म्हटलंय.