साखरेचे 5 आरोग्यवर्धक पर्याय जाणून घ्या, हानीप्रद नाही...
साखर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. डॉक्टरांनी तसेच वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे..पण प्रश्न असा आहे की आपण साखरच जर वापरली नाही तर गोडपणा कुठून मिळणार? तर मग आम्ही आपली ही चिंतापण दूर करतो. आपणास साखरेचे 5 पर्याय सांगत आहोत ज्याचा वापर आपल्या आरोग्यास अजिबात हानिकारक नाही...
1 मूळ खंड आणि खडी साखर -
गोडपणासाठीचे हे आरोग्यदायी पर्याय आहे. जे आपल्याला गोडपणा देतात. तसेच समृद्ध पोषक असतात. हे कॅल्शियम आणि खनिजांनी समृद्ध असते. ते परिष्कृत (रिफाइन) केले नसल्याने शरीरास लाभदायक असतात.
2 नारळी साखर -
नारळ साखर देखील साखरेचा चांगला पर्याय आहे. हे नारळाच्या झाडामधून निघणारे गोड द्रव्यास तयार करून बनविले जाते. जरी ह्यात साखरे सारखे कॅलोरी असले तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरपेक्षा कमी असते. जे आपले शरीर सहज पचवू शकते.
3 खजूराची साखर -
खजूरचा गोडासाठीचा पर्याय एक उत्तम पर्याय आहे. कोरड्या खजूरांना बारीक करून साखऱ्या ऐवजी वापरा. हे चॉकलेट, पेस्ट्री, सांजा, केक किंवा इतरत्र वापरले जाऊ शकते. जरी ह्याचा वापर चहा, कॉफीमध्ये होऊ शकत नसला तरी ह्याचा वापरामुळे हाडं मजबूत होतात.
4 गूळ - गुळाला शुद्ध (रिफाइन) करत नसल्याने हे आपल्याला जीवनसत्वे आणि खनिजांसह सर्व पोषकद्रव्ये देतात. ह्याचे गुणधर्म उष्ण असल्याने सर्दी आणि पडस्यात फायदेशीर असतं
5 कच्चा मध - बाजारात मिळणाऱ्या मधाऐवजी कच्चा मध घेतल्याने हे आपल्याला निव्वळ गोडपणाचं देत नसून वजन पण नियंत्रित ठेवते.