रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: जकार्ता , शुक्रवार, 5 जुलै 2019 (12:25 IST)

पोलंडच्या स्पर्धेत ‘गोल्डन गर्ल’ हिमा दासचा नवा विक्रम

आशियाई खेळांमध्ये 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय धावपटू हिमा दासने पोलंडच्या पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-2019 च्या 200 मीटरमध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.
 
हिमाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन याची माहिती दिली. हिमाने 200 मीटरचे अंतर केवळ 23.65 सेकंदांमध्ये पूर्ण केले आणि सुवर्ण पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त भारताची धावपटू व्ही. के. विस्मायाने 23.75 सेकंदात अंतर पार करत कांस्य पदकावर नाव कोरले.
 
हिमाच्या या यशानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तिचे अभिनंदन केले आहे. सोनोवाल म्हणाले, “पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-2019 च्या 200 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हिमा दासचे अभिनंदन. तुला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.” हिमाने सोनोवाल यांच्या या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले.