शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (13:48 IST)

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ‘आयसीसी'चे प्रयत्न

विश्वातील लोकप्रियतेच्या शर्यतीत फुटबॉल आणि बास्केटबॉलनंतर क्रिकेटचा तिसराक्रमांक लागतो. क्रिकेटचा पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी आयसीसी पुढाकार घेतला आहे. ‘आयसीसी'ने संबंधित देशांकडून याद्वारे होणार्या नफ्याचा अहवाल मागवला आहे.
 
2018मध्ये ‘आयसीसी'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 87 टक्के चाहत्यांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याला होकार दर्शवला होता. यापूर्वी 1900मध्ये पॅरिस येथे झालेल ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सचा 158 धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकावले होते. ‘आयसीसी'ने संलग्न सदस्यांना प्रश्नावली पाठवली असून क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये कायमस्वरूपी समावेश केल्यास कशाप्रकारे आर्थिक लाभ होईल, याविषयी उत्तरेही मागवली आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत सर्व सदस्यांनी याविषयीचा अहवाल ‘आयसीसी'कडे सुपुर्द करावयाचा आहे. ‘आयसीसीने अद्याप 2023 या वर्षांपासूनचा कार्यक्रम आखलेला नाही. त्यामुळे 2024 अथवा 2028च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी ‘आयसीसी' प्रयत्नशील आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन सदस्यांचा  यासंबंधीचा दृष्टिकोन सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल,' असे ‘आयसीसी'च्या पदाधिकार्याने सांगितले.