1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:43 IST)

इंडिया ओपन बैडमिंटनः सिंधूने चलिहाला पराभूत करून सेमीफायनलचे तिकीट मिळवले

India Open Badminton: Sindhu defeats Chaliha to win semifinal ticketइंडिया ओपन बैडमिंटनः सिंधूने चलिहाला पराभूत करून सेमीफायनलचे तिकीट मिळवले Marathi Sports News  In Webdunia Marathi
भारताच्या दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने शुक्रवारी योनेक्स-सनराईज इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत देशबांधव अस्मिता चालिहाला सरळ गेममध्ये पराभूत करून महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित माजी विश्वविजेत्या सिंधूने 36 मिनिटे चाललेल्या लढतीत 21 वर्षीय चालिहा हिचा 21-7, 21-18 असा पराभव केला. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी तिची शेवटच्या चारमध्ये सहाव्या मानांकित थायलंडच्या सुपानिदा कटेथोंगशी लढत होईल.
सिंधू 2019 मध्ये 83 व्या योनेक्स-सनराईज सीनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चालिहाविरुद्ध शेवटची खेळली होती. त्यावेळी आसामच्या युवा खेळाडूने दमदार कामगिरी केली होती.चलिहाला शुक्रवारी पुन्हा गती मिळण्यास बराच वेळ लागला. दुसऱ्या गेममध्ये तिने झुंज दिली असली तरी ती सिंधूला रोखण्यासाठी पुरेशी ठरली नाही. सिंधूने सुरुवातीच्या गेममध्ये आपल्या अनुभवाचा उपयोग करून 11-5 अशी आघाडी घेतली. जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी दोन्ही खेळाडूंमधील दरी वाढत गेली.
चालिहाने दुसऱ्या गेममध्ये 9-9 अशी बरोबरी साधत स्वत:ला चांगले सिद्ध केले. त्यानंतर सिंधूने 15-11 अशी आघाडी घेतली, मात्र चलिहाने पुन्हा पुनरागमन करत स्कोअर 15-15 असा कमी केला. यानंतर सिंधूने आपल्या खेळातील आक्रमकता वाढवत चार गुण मिळवले आणि विजयाच्या जवळ आली.